Thane

ब्रीजवरून पडलेली सळई गाडीच्या छतातून आरपार; थोडक्यात बचावला ड्रायव्हर (Video)

699 0

ठाणे : सध्या मेट्रोची अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मेट्रोचे काम सुरु असताना अचानक एक सळई ब्रीजवरून खाली पडली आणि थेट कारमध्ये जाऊन घुसली. ही धक्कादायक घटना ठाण्यामध्ये घडली आहे.

ही सळई थेट ब्रीजखालून जाणाऱ्या कारवर पडली. ही सळई उभी पडल्याने कारच्या आरपार घुसली आहे. यामध्ये नशीब चांगले म्हणून कार चालकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. हा घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ब्रीजवरुन सळई पडली आणि थेट गाडीचे छत छेदून ड्रायव्हर सीटमध्ये घुसली आहे. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक पाहात राहिले आणि परिसरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. तीन हात नाका या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इको गाडीचं छत छेदून लोखंडी सळई घुसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!