अबब ! राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक ; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शिक्षक

591 0

नाशिक- आरोग्य परीक्षा, म्हाडा परीक्षा आणि आता टीईटी (TET) शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणाने राज्यातील पालकांची झोप उडाली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु असून यामधून समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक नाशिक जिल्ह्यात आढळून आले आहेत.

पुणे पोलिसांना म्हाडा परीक्षेच्या पेपरफुटीचा तपास करताना डॉ. प्रीतीश देशमुख, अंकुश हरकळ, संतोष हरकळ यांना बेड्या ठोकल्या. तेव्हा हे बोगस शिक्षक प्रकरण समोर आले. या संशयितांच्या लॅपटॉपमध्ये चक्क 2019-20 मधील 1270 परीक्षार्थींची यादी सापडली. या घोटाळ्यात आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 15 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

राज्यात 2019 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली. ही परीक्षा 3 लाख 43 हजार 284 जणांनी दिली. त्यातील 16705 जण पास झाले. यापैकी जवळपास 7880 जण हे पैसे देऊन या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या संशयिताकडे या परीक्षार्थींकडून घेतलेले 4 कोटी 68 लाख पोलिसांनी जप्त केले आहेत.

राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक बोगस शिक्षक नाशिकमध्ये आढळले. त्यांची संख्या 1154 आहे. त्यानंतर धुळ्यात 1002, नंदुरबारमध्ये 808, जळगाव 614, पुणे 395, बीड 338 आणि सर्वात कमी बोगस शिक्षक हे गोंदिया जिल्ह्यात 9 आहेत. मात्र, हे झाले फक्त 2019 या वर्षातील परीक्षेचे. त्यापूर्वी शिक्षक भरती कशी झाली, ते उमेदवार तरी पात्र होते का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. एकूणच या प्रकरणामुळे राज्यभरातील पालक चिंतेत आहेत. आपल्या मुलांना योग्य शिक्षक शिकवतात का, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे.

जिल्हानिहाय बोगस शिक्षक

नाशिक – 1154
धुळे – 1002
नंदुरबार – 808
जळगाव – 614
पुणे – 395
बीड – 338
गोंदिया – 9

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!