पिंपरीत दहशत ‘त्या’ हल्लेखोरांची; किरकोळ कारणावरून बाप-लेकीवर सिमेंट ब्लॉकने हल्ला, दैव बलवत्तर म्हणून…वाचा सविस्तर प्रकरण

397 0

पिंपरी : पिंपरी शहरात दिवसेंदिवस स्ट्रीट क्राइमच्या घटना वाढत चालल्या आहेत. पिंपरी येथील जयहिंद कॉलेजच्या कार्नरला दुचाकी घासल्याच्या किरकोळ कारणावरुन आपल्या लहान मुलीसोबत जात असलेल्या एका व्यापाऱ्यावर पाच ते सहा युवकांनी सिमेंट ब्लॉकच्या साह्यानं हल्ला चढवला.

काल सोमवारी सकाळी ही घटना घडली. आपल्यावर हल्ला होत असल्याचं पाहताच संबंधित व्यापारी समोरच असलेल्या एका हॉटलमध्ये घुसला. हॉटलमालकानं त्वरित ग्रीलचा दरवाजा ओढून घेतल्यानं बाप-लेकीचा जीव वाचला. ग्रीलचा दरवाजा ओढून घेतल्यानंतरही हल्लेखोरांनी हॉटेलवर दगडफेक केली. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Share This News
error: Content is protected !!