पिंपरी चिंचवड ते पुणे कोर्ट आणि पुणे कोर्ट ते कोथरूड दरम्यान मेट्रोची तांत्रिक चाचणी आज !

428 0

पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवडकर ज्या मेट्रो ट्रायलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ती मेट्रो ट्रायल आज पूर्ण होत आहे. पिंपरी चिंचवड ते पुणे कोर्ट, पुणे कोर्ट ते कोथरूड दरम्यान आज पुणे मेट्रोची तांत्रिक चाचणी पहिल्यांदाच होणार आहे.

यापूर्वी पिंपरी ते फुगेवाडी आणि कोथरूड ते गरवारे कॉलेज असा मेट्रो मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड ते पुणे कोर्ट, पुणे कोर्ट ते कोथरूड दरम्यान महा मेट्रो धावणार आहे. फुगेवाडी ते पुणे कोर्ट आणि पुणे कोर्ट ते गरवारे कॉलेज दरम्यान महा मेट्रोचे 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महा मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच पुणे मेट्रो आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने पुर्ण मार्गावर धावणार असा विश्वास ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!