अपुऱ्या पगारामुळे पुणे महानगरपालिकेच्या शाळांकडे शिक्षकांनी फिरवली पाठ

445 0

पुणे : राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. यापूर्वीही शाळा सोडल्याचा दाखल्याविना मनपा शाळेत प्रवेश द्यावा याची आग्रही व यशस्वी मागणी केली होती.

कोरोना प्रादुर्भाव काळात खाजगी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची शालेय फी थकल्यामुळे अनेक पालकांनी पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेतले. त्यामुळे साहजिकच महानगरपालिका शाळांचा पट मोठ्या संख्येने वाढला असून त्याकरिता ३५० शिक्षकांची भरती होणे आवश्यक असताना २८९ शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात आली. तरी देखील त्यातून फक्त १२० शिक्षक सेवेत रुजू झाले.

आम्हाला माहिती प्राप्त झाल्यानुसार सदर शिक्षकांना एकवट १५ हजार मासिक पगार दिला जातो. अपुऱ्या पगारामुळे कदाचित शिक्षकांनी याकडे पाठ फिरवली असण्याची शक्यता आहे. याच तुलनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षकांना एकवट २५ हजार मासिक पगार देत आहे. यासंदर्भात योग्य ती चौकशी होणे गरजेचे आहे.

महत्वाचे बाब म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्राथमिक शिक्षण देणे ही पुणे मनपाची जबाबदारी असून शिक्षकांअभावी त्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तातडीने आवश्यक ती शिक्षक भरती करून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही राष्ट्रवादी अर्बन सेलची आग्रही मागणी अर्बन सेल अध्यक्ष नितीन म. कदम यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!