टॅनिंग फक्त उन्हाळ्यातच होते ? नाही…! हिवाळ्यातील हात आणि पायांवरील टॅनिंग कमी करण्यासाठी वापरून पहा हे होममेड स्क्रब

427 0

अनेक जणांना असं वाटत असतं की शरीराचं टॅनिंग हे फक्त उन्हाळ्यातच होतं. पण हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हिवाळ्यामध्ये तर त्वचेला आणखीन काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्वचा कोरडी न होऊ देणे याचबरोबर टॅनही होऊ न देण्यासाठी काही खास स्क्रब आज मी तुम्हाला सांगणार आहे. या स्क्रब मुळे तुमच्या हात आणि पायाची त्वचा नक्कीच टॅन होण्यापासून वाचणार नाही तर टॅन झाली असेल तर हळूहळू कमी होईल. तर मग हे होममेड स्क्रब कसे बनवायचे हे पाहुयात…

१. कॉफी स्क्रब : यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे कॉफी त्यामध्ये थोडे खोबरे तेल आणि साखर घाला हे सर्व मिश्रण नीट मिसळा आणि हाताला किंवा पायाला लावून गोलाकार आकारात चार ते पाच मिनिटे स्क्रब करा. आता पुन्हा पाच मिनिटानंतर हा पॅक तसाच हातावर राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

The Benefits Of Using A Homemade Coffee Scrub

२. साखर आणि नारळाचं तेल : साखर आणि नारळाच्या तेलापासून सर्वात गुणकारी स्क्रब बनवता येतो. याने केवळ ट्यानच रिमूव होत नाही तर हाताला स्क्रबिंग झाल्यामुळे हाताची किंवा पायाची त्वचा ही मुलायम होण्यास मदत होण्यासाठी यासाठी एक चमचा साखर यामध्ये खोबऱ्याचे तेल मध आणि काही थेंब लिंबाचा रस घाला हे सर्व मिश्रण एकजीव मिसळा आणि त्यानंतर हाताला गोलाकार आकारात तीन ते चार मिनिटे मसाज करा. त्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

केवळ केसांंच्या वाढीसाठी नव्हे तर 'या' कारणांंसाठीही नारळाचं तेल ...

३. डाळीचे पीठ-आंबेहळद : डाळीचे पीठ आणि आंबेहळद या पॅकचा सर्वात चांगला उपयोग होतो. यासाठी तुम्हाला दोन चमचे डाळीच्या पिठामध्ये दोन लहान चमचे आंबेहळद घ्यायची आहे. आंबेहळद सहज किराणा दुकानांमध्ये मिळेल किंवा तुम्ही घरातली हळद देखील वापरू शकता. यामध्ये दुधाची साय किंवा निरस दूध घालून हात आणि पायाला छान स्क्रब करा. आठवड्यातून तीन वेळा तरी हा प्रयोग करून पहा. आंघोळीच्या वेळी साबणाच्या ऐवजी हा पॅक वापरला तरीही उत्तम.

केसातून कोंडा कायमचा जाईल ! केसातील कोंडा घालवण्यासाठी दहा सोपे घरगुती ...

Share This News
error: Content is protected !!