तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ; सोलापुरात हलगीनाद करून आनंद साजरा

174 0

मुंबई : अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे. आज भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांनी मंत्र पदाची शपथ घेतली आहे. अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. शिंदे भाजप सरकारने अनेक धक्कादायक निर्णय घेऊन पुढील राजकीय खेळीचा विचार करता अनेक अनपेक्षित आणि अपेक्षित अशा आमदारांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ टाकली आहे .

यामध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या गळ्यात मंत्रिमंडळाची माळ पडली आहे . दरम्यान सोलापूरच्या वाकाव गावामध्ये आनंद उत्सव साजरा केला जातोय . हलगीनाद करून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

2015 साली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला . तर 2016 साली ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते .2014 सालच्या सेना भाजप सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री होते. तर 2019 मध्ये ते उस्मानाबाद येथील परांडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले.

महाविकास आघाडीमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असणारे तानाजी सावंत यांना शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीपद आज दिले आहे . त्यामुळे सोलापूर आणि परिसरातून जल्लोष साजरा करण्यात येतो आहे.

Share This News
error: Content is protected !!