सुप्रीम कोर्टाचा नुपूर शर्मा यांना दिलासा ; अटकेची याचिका मागे घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला

294 0

दिल्ली : मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे . कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की , अशी याचिका करताना सरळ वाटते पण त्याचे दूरगामी परिणाम होतात . आमचा सल्ला आहे की ही याचिका मागे घ्यावी.

दरम्यान याच प्रकरणी 19 जुलै रोजी झालेल्या सुनावणी मध्ये कोर्टाने 10 ऑगस्टपर्यंत नुपूर शर्मा यांची अटक रोखली होती. नुपूर शर्मा यांच्या विरोधात कोणतीही शिक्षेची कारवाई करू नका असे निर्देश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर कोर्टाने नुपूर शर्मा यांना देखील चांगलेच खडसावले. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात हिंसा वाढली असून त्याला तुम्ही एकट्या जबाबदार आहात , अशी कान उघडणी सुप्रीम कोर्टाने केली होती .

 

Share This News
error: Content is protected !!