औरंगाबाद : औरंगाबाद मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव अग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनिल यांनी आपल्या आहात्या घरामधील जिममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ते घरामधील जिम मध्ये गेले होते. बराच वेळ घरात न आल्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना बोलावण्यासाठी जिममध्ये गेल्या तेव्हा त्यांना अनिल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
दरम्यान अनिल अग्रहारकर यांचे सध्या इमारतीचा प्रकल्प आणि इतर काही साइटवर काम सुरू असल्याचे समजते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी दोन पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी चार व्यवसायिकांची नावे लिहून ठेवली आहेत. या व्यवसायिकांनी त्यांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलीस स्थानकामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.