थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग, चोरीसाठी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता

617 0

पुणे- पुण्याजवळील थेऊर इथं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडलीये.

घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालंय

यशवंत सहकारी सहकारी साखर कारखाना हा अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊरच्या चिंतामणी मंदिराशेजारी आहे. कारखान्यावर झालेल्या कर्जामुळे कारखाना सध्या बंद अवस्थेत एका बँकेकडे गहाण आहे. प्राथमिक माहितीनुसार कारखान्यातील साहित्य चोरण्यासाठी माथेफिरूने कारखाना पेटवून दिल्याचं समजतंय. लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कारखान्याला जाणूनबुजून आग लावल्याचा आरोप माजी संचालक पांडुरंग काळे यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!