#कौतुकास्पद : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बनवली दिव्यांग बांधवांसाठी खास ब्लाइंड स्टिक, कसा होणार फायदा पहा

1284 0

नाशिक : इगतपुरी शहरातील महात्मा गांधी हायस्कूल येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांनी दिव्यांग बांधवांना उपयुक्त ठरेल अशी ब्लाइंड स्टिक बनवली आहे. या काठीमुळे दिव्यांग बांधवांना दिड फुटांवर काही अडथळा आल्यास त्याची पूर्वसूचना मिळणार आहे.

आय. ओ. टी.(Internet of things ) कोर्स करत असताना शिक्षिका अनिषा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्याना प्रश्न विचारला की. तुम्ही विशेष असे काय करू शकतात त्यानंतर विद्यार्थ्याना कल्पना सुचली की, आपण दिव्यांग बांधवांसाठी अशी काठी बनवूया जेणे करून ते चालत असताना समोर काही अडथळा आला तर त्यांना लगेच कळेल व ते आपला मार्ग सुरक्षितपणे बदलतील.

ह्या भावनेने हे विद्यार्थी लगेच काठी बनविण्यासाठी कामाला लागले व अवघ्या एक दिवसात त्यांनी या काठीची निर्मिती केली आहे. ही काठी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाईप, अल्ट्रा सोनिक सेन्सर, बझर, मायक्रो कंट्रोलर, आर डी नो उनो बोर्ड, 9 वॉल्ट ची बॅटरी इत्यादी साहित्याचा वापर केला आहे. ही काठी बनविण्यासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक अनिल पवार, उप मुख्याध्यापक उमाकांत वाकलकर, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत ठाकरे, शिक्षिका अनिशा कुलकर्णी, शिक्षक अविनाश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले, मुलांनी बनविलेल्या या काठीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुार ६ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना इंटरनेट ऑफ थिंग्स हा कोर्स शिकवला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असून विदयार्थी स्मार्ट डस्टबिन, स्मार्ट कार, स्मार्ट संगणक लवकरच बनवणार आहेत त्या दृष्टीने त्यांची कार्यशाळा सुरू आहे.

या विद्यार्थ्यांनी बनवली स्टिक

(1)हृदय बागल (2) प्रितेश भागडे (3) निखिल चव्हाण (4)जगदीश राक्षे (5)अनिल चौधरी (6) सुनील चौधरी (7) हर्षद भागडे (8) रोहित गांगुर्डे (9) जय शिंदे (10) अंकुश मोरे (11) सार्थक मुळीक (12) जयेश भागडे (13) वैभव पाटील

Share This News
error: Content is protected !!