“सुडाच्या राजकारणाच्या नाकावर टिच्चून..!” अनिल देशमुख जेलमधून बाहेर आल्यानंतर रोहित पवारांचे ट्विट, वाचा सविस्तर

218 0

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज अखेर जामीनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातूनअनिल देशमुख तब्बल 13 महिने 26 दिवसानंतर बाहेर आले आहेत. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेलबाहेर उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ ‘टायगर इज बॅक’, ‘ हौसला बुलंद रहे’चे फलक देखील झळकले आहेत.

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून अनिल देखमुख यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी लिहिले आहे, “सुडाच्या राजकारणाच्या नाकावर टिच्चून..!” त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!