MBA प्रवेश प्रकीया तातडीने सुरु करा ; स्टुडंट हेल्पींग हँडसची मागणी

314 0

पुणे : राज्यातील एमबीए सीईटी परीक्षाचा निकाल लागुन जवळपास महिना होत आला आहे. या परीक्षेला राज्यभरातुन लाखो विद्यार्थी बसले होते. परंतु अद्याप त्यांची प्रवेश प्रक्रीया सुरू झाली नाही.

महत्वाच्या पदावर प्रोमोशन असेल तसेच व्यावसायिक पदावरील चांगल्या संधी असतील यासाठी जास्तीत जास्त लोकांचा कल हा एमबीए कोर्ससकडे असतो. या कोर्ससला विद्यार्थी रेग्युलर न जाता व्यवसाय व नोकरी करतअसतानाच हा कोर्स करतात. पण प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थीकडुन मँनेजमेंट मधुन हवे तसे रक्कम घेता येते. विशेषत, खाजगी काँलेज किंवा विद्यापीठ.पर्यायांनी जे मोठी रक्कम देतात. त्यांनाच प्रवेश मिळतोय. यासाठी तर प्रवेश प्रक्रीया लांबवली नाही ना? याचा शासनाने खूलासा करावा.

अशावेळी साधारण विद्यार्थीचे हाल होत आहेत. गुणवत्ता असुनही त्यांना वंचित राहावे लागते. अशा वेळी विद्यार्थी हीत लक्षात घेता तातडीने एमबीए प्रवेशप्रक्रीया सुरु करावेत अशी मागणी स्टुडंट हेल्पींग हँडसचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!