नागपूरमध्ये स्टार बसला भीषण आग, बसबाहेर पडल्यामुळे प्रवासी सुखरूप, पाहा व्हिडिओ

477 0

नागपूर- नागपूरमधील संविधान चौकात स्टार बसला अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी बसमधून ४५ प्रवासी प्रवास करत होते. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले. एका वृद्ध महिलेला वाहकाने उचलून बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुन्हा एकदा स्टार बसच्या मेंटेनन्स चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचे पर्यंत बस जाळून खाक झाली होती. यंदाच्या उन्हाळ्यात स्टार बसला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. एकूणच स्टार बसची हालत खस्ता असून स्टार बसचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याची तक्रार आहे. यापूर्वी देखील मेडिकल चौकात बस पेटली होती. तापमान वाढल्यामुळे बस पेटतात. पण योग्य देखभाल दुरुस्ती केली तर बस पेटणार नाही असे चालकांचे म्हणणे आहे.

Share This News

Related Post

Vinod Patil

Vinod Patil : विनोद पाटलांची छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून माघार

Posted by - April 24, 2024 0
छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा दिलेल्या विनोद पाटील (Vinod Patil) यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी…

दहावीच्या परीक्षेत शिक्षकच विद्यार्थ्यांना पुरवतोय कॉप्या, पैठण तालुक्यातील प्रकार (व्हिडिओ)

Posted by - March 17, 2022 0
औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी शाळेने मोठा मांडव टाकून त्यामध्ये विद्यार्थ्यांना…

टॅनिंग फक्त उन्हाळ्यातच होते ? नाही…! हिवाळ्यातील हात आणि पायांवरील टॅनिंग कमी करण्यासाठी वापरून पहा हे होममेड स्क्रब

Posted by - January 7, 2023 0
अनेक जणांना असं वाटत असतं की शरीराचं टॅनिंग हे फक्त उन्हाळ्यातच होतं. पण हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हिवाळ्यामध्ये तर…
Pune News

Pune News : खडकवासला धरणात कारसह बुडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 31, 2023 0
पुणे : रक्षाबंधानाच्या दिवशी पुण्यातील (Pune News) एका कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात…

विधान परिषद निवडणूक: काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी

Posted by - June 8, 2022 0
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई महापालिकेची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *