नागपूरमध्ये स्टार बसला भीषण आग, बसबाहेर पडल्यामुळे प्रवासी सुखरूप, पाहा व्हिडिओ

529 0

नागपूर- नागपूरमधील संविधान चौकात स्टार बसला अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी बसमधून ४५ प्रवासी प्रवास करत होते. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले. एका वृद्ध महिलेला वाहकाने उचलून बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुन्हा एकदा स्टार बसच्या मेंटेनन्स चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचे पर्यंत बस जाळून खाक झाली होती. यंदाच्या उन्हाळ्यात स्टार बसला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. एकूणच स्टार बसची हालत खस्ता असून स्टार बसचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याची तक्रार आहे. यापूर्वी देखील मेडिकल चौकात बस पेटली होती. तापमान वाढल्यामुळे बस पेटतात. पण योग्य देखभाल दुरुस्ती केली तर बस पेटणार नाही असे चालकांचे म्हणणे आहे.

Share This News
error: Content is protected !!