ग्रामपंचायत निवडणूक काळात एसटी महामंडळ मालामाल; पुणे विभागानं किती कमावलं उत्पन्न ?

243 0

पुणे : राज्यात झालेल्या 7751 ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला चांगलाच फायदा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये एसटीला एसटी महामंडळाच्या पुणे विभागाला 2 कोटी 56 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.

एसटीच्या पुणे विभागात एकूण 13 डेपो आहेत राज्याच्या अनेक भागातील नागरिक हे नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राहत असतात रविवारी राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली या मतदानासाठी शहरातून गावाकडं जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळं एसटीला शनिवार व रविवार या दोन दिवशी गेल्या काही दिवसांमधील सर्वाधिक प्रवासी आणि उत्पन्न मिळालं असून शिवाजीनगर आणि स्वारगेट डेपोमध्ये सर्वाधिक गर्दी नोंदवली गेली.

एकंदरीतच काय तर ग्रामपंचायत निवडणूक एसटी महामंडळाच्या पथ्यावर पडली असंच म्हणावं लागेल

Share This News
error: Content is protected !!