ST

ST Bus : एसटी महामंडळाने रचला विक्रम; एका दिवसात 35 कोटींचा टप्पा केला पार

1831 0

मुंबई : मागच्या अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळ (ST Bus) मोठ्या प्रमाणात तोट्यात आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लोकांचा एसटीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.16 नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाने 35 कोटी 18 लाख रुपये कमवून सर्वोच्च उत्पनाचा विक्रम रचला आहे. एसटीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील एक दिवसांत मिळवलेल्या सर्वाधिक उत्पन्नापैकी हे सर्वाधिक उत्पन्न आहे.भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान 95 कोटी 35 लाख रुपयांचं उत्पन्न एसटीने कमावलं. राज्यात कोणतीही घडामोड घडली तर त्याचा थेट परिणाम हा एसटीवर होतो.

एसटी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ निर्णय
दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे
पुरुष, महिलांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात असं पत्रक काढण्याचा निर्णय झाला
बोनस वाढला पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जाहीर करतील
आजपासूनचं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
2 हजार 200 नवीन गाड्या येणार
2025-26 ला 2500 बस येणार
येत्या चार वर्षात एसटीत नऊ हजार बसेस दाखल होतील.
दोन वर्षात अडीच हजार ईव्ही गाड्या दाखल होतील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Indian Army : भारतीय लष्कराची जम्मू – काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 5 दहशतवादी ठार

Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजे यांचा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केली ‘ही’ मोठी मागणी

Share This News
error: Content is protected !!