SPECIAL REPORT : पुण्यातील पुल कधी आणि का पाडले गेले ? वाचा सविस्तर

558 0

पुण्यातील चांदणी चौक जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज मध्यरात्री चांदणी चौक जमीनदोस्त केला जाणार आहे. मात्र जमीनदोस्त होणारा हा पहिला पुल आहे का ? तर नक्कीच नाही..मग या अगोदर असे किती पुल पाडले गेले याच विषयावरचा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पुण्यातील कधी आणि का पाडले गेले ?

विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं आता उद्योगनगरी म्हणून उदयास येत आहे वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात येते मात्र कालांतरानं वाहतूक वाढल्यानं अथवा चुकीच्या पद्धतीनं बांधकाम झाल्यानं हे पूल जमीनदोस्त केले जातात असे कोणते पुल जमीनदोस्त झाले हे पाहुयात…

1) अमृतांजन पुल : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील वाहतुकीस अडथळा ठरणारा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल रविवार 5 एप्रिल 2020 जमीनदोस्त करण्यात आला. इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा असणारा हा पूल अखेर इतिहासजमा झाला आहे. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने तीनशे किलो नियंत्रित स्फोटकांच्या साहाय्याने हा पूल पाडण्यात आला. महामंडळाच्या वतीने मोठी खबरदारी घेत मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या लॉकडाउन सुरू असल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता द्रुतगती मार्गावर वाहतूक तुरळक असल्याने पाडण्यासाठी योग्य कालावधी होता असं यावेळी सांगण्यात आलं होतं.

See the source image

2) विद्यापीठ चौक पुल : हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यान मेट्रोचे काम सुरू होणार आहे, त्यामध्ये हे पूल अडथळा ठरत आहेत त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील सर्वात मोठे आणि जुने 3 उड्डाण पूल एकावेळी न पाडता तीन टप्प्यात पाडण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे आणि कोरोना साथीमधील लॉकडाऊनच्या काळात 14 जुलै ते दहा ऑगस्ट 2020 दरम्यान येथील पूल जमीनदोस्त करण्यात आला.

आणि आता….

3) चांदणी चौक : वाहतुकीस अडथळा येत असल्याचं सांगत आता पुण्यातील चांदणी चौकात असणारा पुल जमीनदोस्त केला जाणार असून चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे.

See the source image

Share This News
error: Content is protected !!