‘नवं काहीतरी’: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं आज पुण्यात व्याख्यान

445 0

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून या पुणे दौऱ्यादरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये आपले विचार व्यक्त करणार आहे.

नव काहीतरी या विषयावर राज ठाकरे यांचं पुण्यातील मुक्तांगण बालरंजन केंद्र सहकारनगर या ठिकाणी व्याख्यान होणार असून या व्याख्यानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार कोणावर निशाणा साधणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय.

मनसेचे पुणे शहरातील ताकतवार नेते वसंत मोरे मागील अनेक दिवसापासून पक्षावर नाराज असून पक्षातील पुणे शहरातील कोअर कमिटीवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात. या सगळ्या वसंत मोरे यांच्या नाराजी नाट्यावर राज ठाकरे आज आपली भूमिका मांडणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे

Share This News
error: Content is protected !!