सोलापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : जनता थेट करणार गावच्या सरपंचाची निवड; सरपंचपदासाठी 1068 अर्ज दाखल, वाचा सविस्तर

300 0

सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी सरपंचाची निवड थेट जनता करणार असल्यामुळे रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायत मधील 646 वॉर्डसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. यामध्ये सरपंच पदासाठी १०६८अर्ज दाखल झाले आहेत. तर ग्राम पंचायत सदस्यांसाठी ५८७९ अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

दोन डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. त्यानुसार ही आकडेवारी स्पष्ट झाली असून दाखल अर्जाची छाननी सोमवारी सकाळी 11 पासून सुरू होईल. त्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याबद्दलच लढतीचे नक्की स्वरूप स्पष्ट होईल.

Share This News
error: Content is protected !!