पानशेत परिसरातील धिंडली (वरघड) येथील एका रिसॉर्टच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात परप्रांतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पाय घसरून पडल्याची घटना शुक्रवारी (ता. ०७) रोजी घडली होती. पाण्यात पडलेल्या युवकाचा १४ तासाच्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी नऊच्या दरम्यान मृतदेह सापडला.
मोहीम हेमंत सराफ (वय-३०) राहणार लक्ष्मीगल्ली कुठीर मध्यप्रदेश असे या संगणक अभियंत्याचे नाव आहे.
पानशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल ते ७ एप्रिल रोजी अवलारा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मीटिंग बाणेर येथील अमर सदानंद टेक्नॉलॉजी पार्क येथे आयोजित करण्यात आली होती. या मिटिंगसाठी मोहीम सराफ पुण्यात आला होता.
मोहीम हेमंत सराफ (वय-३०) राहणार घर नं. ६९, लक्ष्मीगल्ली कुठीर, लक्ष्मीपुरा, वार्ड-सागर, राज्य-मध्यप्रदेश असे युवकाचे नाव असून बाणेर येथील एका खासगी आय. टी. कंपनीच्या मीटिंगसाठी तो पुण्यात आला होता.
काल, शुक्रवारी दुपारी तीन वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले व मुली यांचा ग्रुप पानशेत परिसरातील धिंडली (ता. वेल्हे) येथील आर्यावत रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता. सायंकाळी साडेपाच वाजता सर्वजण रिसोर्टवर पोहचले. रिसोर्ट फिरल्यानंतर अनशुल कमल अमेठा, वृषाली रामभाऊ गायधने, हरविंदरजित भुरसिंग सिंग, शबनम नरुद्दीन सिध्दीकी, मानसी संजयकुमार अगरवाल, मोहीत हेमंत सराफ हे सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॅाटर पाहण्यासाठी पायी चालत गेले. धरणाच्या बॅंकवॅाटरच्या पाण्यात गुडगाभर पाण्यात सर्वजण गेले. यावेळी मोहीम सराफ याचा पाय घसरुन खोल पाण्यात पडला.