#Social Media Influencer : तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात का ? केंद्र सरकारने जाहीर केलेली ही नियमावली वाचा; अन्यथा होऊ शकतो 50 लाखाचा दंड

835 0

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर तयार होत आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट्स विषयी माहिती देताना मात्र आता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला केंद्राने जाहीर केलेल्या या नियमावलीचा प्रथम अभ्यास करावा लागणार आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचा संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने इंक्लुएजरसाठी एक नियमावली जाहीर केली आहे.

जर इन्फ्लुएन्सरकडून या नियमावलीचा भंग करण्यात आला तर 50 लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीच्या पद्धतीने सशुल्क सामग्रीचा प्रचार केला गेला तर दहा लाख रुपयांचा सर्वप्रथम दंड आकारला जाईल आणि पुन्हा पुन्हा याच नियमांचे उल्लंघन जर तुम्ही कराल तर 50 लाखांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये जाहिराती सोप्या स्पष्ट भाषेत असाव्यात , जाहिरात किंवा सशुल्क जाहिरात यांसारख्या संज्ञा वापरण्यात याव्या. इन्फ्लुएंजर्सने अशा कोणत्याही उत्पादन किंवा सेवेचा समर्थन करू नये ज्यामध्ये त्यांनी योग्य परीक्षण केलं नाही. किंवा त्यांनी ते वैयक्तिक रित्या वापरलेलं नाही. असे नियम यापुढे इन्फ्लुएजरसाठी असणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!