#PUNE : …तर चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते; कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले ‘हे’ कारण !

709 0

पुणे : सध्या पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीचे वारे वाहते आहे. पण अशातच कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी एक मोठे वास्तव समोर आणले आहे. त्यानुसार चिंचवड आणि कसबा पोट निवडणूक रद्द होऊ शकते असे मोठे वक्तव्य त्यांनी केले आहे.

प्रसिद्ध कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी सांगितल्यानुसार, चिंचवड आणि कसबा पोट निवडणूक रद्द होऊ शकते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा निकाल अजून सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी येत्या 14 फेब्रुवारीला निर्णय लागण्याची शक्यता आहे.

या निर्णयानुसार जर आमदार अपात्र ठरले तर विधानसभा बरखास्त होऊ शकते आणि असं झालं तर कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुका देखील बरखास्त होऊ शकतात असे मोठे स्पष्टीकरण सरोदे यांनी केले आहे. त्यामुळे आता कसबा आणि चिंचवड या विधानसभा पोट निवडणुकीचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

Share This News
error: Content is protected !!