साटलोट करायला तयार नव्हती वहिनी; दिराने उचलले टोकाचे पाऊल, दिला एवढा भयानक अंत

1169 0

राजस्थान : राजस्थानमध्ये आज देखील अनेक प्रथांना खूप महत्त्व दिले जाते. अशाच एका प्रथिने आज एका महिलेचा भयावह अंत ओढायला आहे. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यामध्ये हे भयानक हत्याकांड घडले आहे. वहिनींन आपली मुलगी साटेलोटेच्या प्रथेसाठी देण्यास नकार दिला होता. याचा राग मनात धरून तिच्या दोन दिरांनी वहिणीला कुऱ्हाडीने वार करून तिची निर्दयपणे हत्या केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वहिनी आपली मुलगी प्रथेसाठी देण्यास नकार देत होती. या कारणाने आरोपी दिरांच लग्न होत नव्हतं. यातूनच या दोघा दिरांनी हत्येचा कट रचला होता. घरात मोठा भाऊ नसल्याची शहानिशा करून या दोघांनी वहिनीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये इंद्रा रतन सिंह कवर वय वर्ष 45 या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर मध्ये पडलेल्या त्यांच्या मुलावर देखील कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला करण्यात आला. या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत.

धक्कादायक म्हणजे हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या शेजाऱ्याची देखील हत्या करण्यात आली आहे. मध्ये पडणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करून आरोपींनी त्यांना देखील कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले. हे सर्व काही थरारक नाट्य घडत असताना घरातील मुलीन पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिस घटनास्थळी आले असता या दोन्ही आरोपींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये डुंगर सिंह आणि पहाड सिंह या दोघा मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!