सिंहगडाचा श्वास मोकळा : किल्ले सिंहगडावर पुणे विभागाची अतिक्रमण निर्मूलन कारवाई

404 0

पुणे : शुक्रवारी पहाटेपासून किल्ले सिंहगडावर पुणे वनविभागाने अतिक्रमण निर्मूलन कारवाईला सुरुवात केली आहे.  सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच गडाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आज सकाळी सहा वाजता पासून सिंहगडाच्या पायथ्यापासून किल्ल्याच्या माथापर्यंत विखुरलेल्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण निष्कासित करण्याचा निर्णय स्टॉल धारक यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला होता. त्यानुसार अतिक्रमण धारकांना कायदेशीर पद्धतीने नोटीस देण्यात आल्या असून वन विभागामार्फत अवैध झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले आहे. 

शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा वाहतूक कोंडी आणि पार्किंगसाठी जागा नसल्या कारणानं अनेकांना मागे फिरावे लागत होतं. पण आता असे होणार नाही, कारण निष्कासन झाल्यानंतर किल्ले सिंहगडाला असलेला ऐतिहासिक वारसा तसेच गडाचे सौंदर्य अबाधित होणार आहे.

हे अतिक्रमण काढल्यानंतर पार्किंगची देखील जागा विस्तारणार आहे. तसेच दुचाकी आणि चार चाकी वाहनांना पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी होणारे वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!