ब्रेकिंग न्यूज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याची ६ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

294 0

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

ठाण्यातील ‘नीलांबरी’ प्रकल्पातील ११ निवास युनिट्स हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपच्या कंपनीचा भाग आहेत. याच मालमत्तेवर ईडीने कारवाई केल्याची माहिती आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.

ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.

Share This News
error: Content is protected !!