“कंडोमच्या जाहिरातीमध्ये गरबा खेळताना दाखवणे भावना दुखवणे नाही, जाहिरातीचा उद्देश केवळ…!” हायकोर्ट निकाल देताना काय म्हणाले वाचा

490 0

मध्य प्रदेश :”कंडोमच्या जाहिरातीमध्ये गरबा खेळताना दाखवणे म्हणजे भावना दुखणे नाही…!” असा स्पष्ट निकाल मध्यप्रदेश हायकोर्टाने दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टाचे न्यायाधीश सत्येंद्र कुमार सिंह यांच्या एक सदस्य खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

महेंद्र त्रिपाठी यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 505, 295 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या विरोधात हायकोर्टात त्रिपाठी यांनी धाव घेतली. त्रिपाठी यांनी ऑक्टोबर 2018 साली नवरात्र उत्सवा दरम्यान जोडप्यांसाठी मोफत कंडोम आणि गर्भधारणा चाचणी किटची जाहिरात पोस्ट केली होती. यावेळी त्यांनी गरबा खेळणाऱ्या जोडप्याची प्रतिमा वापरली होती. यावरूनच हा वादंग निर्माण झाला. त्यानंतर त्रिपाठी यांच्या विरोधात भावना दुखावली असल्याचा आरोप करून एफआयआर दाखल करण्यात आली होती.

यावेळी मी स्वतः हिंदू आहे. आणि धार्मिक गटांमधील कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व वाढवण्याचा किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असा युक्तिवाद त्रिपाठी यांच्या बाजूने कोर्टात करण्यात आला होता. तर गरबा कालावधीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही जाहिरात पोस्ट केल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच कंडोम उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांनी ऑफर लॉन्च केली होती.

दरम्यान हायकोर्टाने दिलेल्या निरीक्षणानुसार, त्यातील मजकूर अश्लील नसून त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 67 नुसार कारवाई होऊ शकत नाही. खटला चालवावा इतके भक्कम पुरावे नाहीत. तसेच कोणत्याही समूहाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू देखील दिसून येत नाही. म्हणून दाखल केलेला गुन्हा देखील हायकोर्टाने रद्द केला आहे. तसेच जाहिरातीच्या माध्यमातून अश्लीलता पसरवली जात नसल्याचा आरोप ही कोर्टाने फेटाळून लावला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!