#SHOCKING VIDEO : नाशिकमध्ये फिल्मी स्टाईल थरार; गाडीला धडक देऊन तरुणावर भयानक हल्ला

686 0

नाशिक : नाशिकमध्ये नुकताच एका तरुणावर भयावह हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याच सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा व्हिडिओ पाहून अक्षरशः अंगावर काटा येईल. कारण एखाद्या चित्रपटाच्या सीनला शोभावा असा हा घटनाक्रम आहे.

सुरुवातीला या तरुणाच्या कारला जोरदार धडक देण्यात आली. त्यानंतर या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार देखील करण्यात आला. तर कोयत्याने देखील वार करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या कारमधून प्रवास करत होते. यावेळी कार्बन नाका परिसरात या घटनेतील आरोपींनी कारने जाधव यांच्या कारला मागील बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, जाधव यांची कार अक्षरशः जागेवर गोल फिरली. त्यानंतर जाधव यांचा दोघाजणांनी पाठलाग केला. यावेळी गोळीबार आणि कोयत्याने देखील वार करण्यात आले असून या हल्ल्यामध्ये जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना जुन्या वादातून घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!