पुणे : वाघोलीमध्ये आज पहाटेच्या सुमारास एस.टी.पी टॅंकचे काम चालू असतांना ३ कामगारांचा टॅंक मध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोलासिया सोसायटी फेज-२ वाघोली पुणे येथे टँकचे काम चालू होते. घटनेची माहिती स्थानिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( PMRDA) वाघोली अग्निशमन केंद्र येथे सकाळी ०७:०० वाजेच्या दरम्यान दिली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीने दाखल झाले. ऐन दिवाळीत हि दुःखद घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
या घटनेमध्ये नितीन प्रभाकर गोंड वय-४५ ( बुलढाणा) , सतिशकुमार चौधरी वय-३५ ( उत्तर प्रदेश) आणि गणेश पालेकराव वय-२८ ( नांदेड) या कामगाराचा दुर्दैवी अंत झाला आहे. गजानन कुरमभट्टी हे ठेकेदार आहेत. अग्निशमन दलाला माहिती मिळतात अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी श्री विजय महाजन. वाहन चालक – नितीन माने, संदीप शेळके फायरमन- चेतन खमसे , मयूर गोसावी , तेजस डांगरे , विकास पालवे, अभिजीत दराडे , अक्षय बागल हे तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन अथक प्रयत्नानंतर दोन मृत व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.