धक्कादायक : पवना धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू

2473 0

मावळ : मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दुधीभोरे गावाजवळ पवना डॅमच्या बॅक वॉटर भागात पिकनिकसाठी काही पर्यटक आले होते. या पर्यटकांपैकी प्रेम प्रकाश भाटिया वय वर्षे 62 हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले आहेत.

प्रेम प्रकाश भाटिया हे शिक्षक होते. लोणावळा ग्रामीण पोलीस, पोलीस मित्र, शिवदुर्ग टीम, वन्यजीव रक्षक संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने या पर्यटकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अधिक तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!