धक्कादायक : प्रेमात झाले किरकोळ वाद; प्रेयसीवर केला थेट धारदार शस्त्राने वार, पुण्यात थरार

590 0

पुणे : पुणे पुन्हा एकदा एका भयंकर हत्याकांडानं हादरल आहे. पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा तिच्या प्रियकरानं धारदार शस्त्राने वार करून निघृण खून केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्वेता रानवडे वय वर्ष 22 असं या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीचे आज दुपारी काही कारणावरून प्रियकरासोबत वाद झाले. हे वाद एवढे विकोपाला गेले की त्याने थेट धारदार शस्त्राने या तरुणीवर जबरदस्त हल्ला केला. हल्ला केल्यानंतर तो तिथून फरार झाला. पण या हल्ल्यामध्ये तरुणी गतप्राण झाली आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचा घोषित केलं. या फरार झालेल्या आरोपी प्रियकराचा पोलीस शोध घेत आहेत.

Share This News
error: Content is protected !!