धक्कादायक : ‘सुंदर’ दिसत नाही म्हणून डॉक्टर असलेल्या तरुणीचे टोकाचे पाऊल ! स्वतःचेच आयुष्य केले उध्वस्त, कर्तृत्व मोठ की सौंदर्य ?

786 0

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश मधून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित डॉक्टर असलेल्या 25 वर्षीय तरुणीने सुंदर दिसत नाही या कारणाने आत्महत्या केली आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या तरुणीने अगदी काही दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात कामकाज सुरू केले होते. दरम्यान झाबुवातील दिलीप गेट या परिसरात ती राहत होती. घरच्यांचा फोन उचलला नाही म्हणून तिच्या घरच्यांनी घर मालकाला फोन लावला होता. घर मालकाने खोलीमध्ये जाऊन पाहणी केली असता या तरुणी घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.

घरमालकानं पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपास सुरू झाला असता, पोलिसांना तिच्या मृतदेह जवळ काहीही संशयस्पद आढळल नाही. परंतु तिने तिच्या डायरीमध्ये ” मी सुंदर दिसत नाही, म्हणून आत्महत्या करावी वाटते…!” असं लिहिल आहे.

घटना घडल्याच्या दिवशी ही तरुणी दिवसभर ड्युटी करून घरी आली होती. त्यानंतर ती घराच्या बाहेर देखील पडली नाही. पण डॉक्टर असलेल्या या तरुणीने अशा कारणासाठी आत्महत्या करावी हे खरंच गांभीर्याने घेण्यासारखं प्रकरण नक्कीच आहे.

Share This News
error: Content is protected !!