धक्कादायक : नव्यानेच शिंदे गटात प्रवेश केलेले निलेश माझीरे यांच्या पत्नीची आत्महत्या

47261 0

पुणे : काही दिवसांपूर्वीच मनसे मधून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केलेले निलेश माझेरे यांच्या पत्नीने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी कौटुंबिक वादातून त्यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी आत्महत्या नक्की का केली ? हे अद्याप समजू शकले नाही.

पक्षांतर्गत धुसफुशीमुळे काही दिवसांपूर्वी मनसेचे माथाडी जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे निलेश माझेरे यांनी जवळपास 400 कार्यकर्त्यांसह मनसेला जय महाराष्ट्र केला होता.

त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. कौटुंबिक वाद विवादातून त्यांच्या पत्नीने अचानक असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Share This News
error: Content is protected !!