पुण्यातील संतापजनक घटना : “तू या दोघांना खूप आवडते, त्यांच्यासोबत संबंध ठेव ! मैत्रिणीला घरी बोलावून मित्रांसोबत करायला सांगितले असले कृत्य…

1424 0

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या दोघा मैत्रिणींमध्ये वादविवाद झाले. हे वाद गंभीर आहेत. कारण एका मैत्रिणीने आपल्या मित्रासोबतच शरीर संबंध ठेवण्यासाठी या मैत्रिणीला धमकावलं आणि मारहाण देखील केली. या प्रकरणी मैत्रिणीन जेव्हा नकार दिला तेव्हा तिच्याविरुद्ध चोरीचा देखील आळ घेण्यात आला. यात मैत्रिणीन तिच्या दोन मित्रांसोबत मिळून तिला मारहाण देखील केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आता या मुलीच्या मैत्रिणीसह दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही केअर टेकर म्हणून काम करते. आरोपी महिला आणि फिर्यादी या दोघीजणी मैत्रिणी आहेत. आरोपी महिलेने मैत्रिणीला रात्री दहाच्या सुमारास घरी बोलावलं होतं. यावेळी तिच्यासोबत आणखी दोघेजण होते. “तू या दोघांना खूप आवडतेस, तू त्यांच्याशी शरीर संबंध ठेव, मी तुला पाच हजार रुपये देण्यास सांगते. ” असे या आरोपी महिलेने तिच्याच मैत्रिणीला सांगितलं.

या केअरटेकर मुलीने नकार दिल्यानंतर पैसे चोरीचा आळ तिच्यावर घेण्यात आला. तिने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या दोघा आरोपींनी तिचा विनयभंग केला. कशीबशी तिने त्या तिघांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि त्यानंतर लगेचच सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली असल्याचा समजते.

Share This News
error: Content is protected !!