पुण्यात धक्कादायक प्रकार : वडिलांसमान असलेल्या काकानेच केले दोन सख्या बहिणींवर अत्याचार

1144 0

पुणे : कामानिमित्त दिल्लीला गेलेल्या आई-वडिलांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना त्यांच्या काकाकडे राहण्यास ठेवले. पण वडिलांसमान असलेल्या काकांनच या मुलींचा गैरफायदा घेतला आहे. या प्रकरणांमध्ये दोन पीडित एकीचे वय 14 वर्षे आणि एकीचे वय दहा वर्षे आहे. या दोघींच्या आई-वडिलांनी विश्वास ठेवून त्यांच्या काकाकडे त्यांना राहण्यास ठेवले होते.

परंतु काकानं स्वतः आणि एका मित्राने या दोघींवरही अत्याचार केले आहेत. या प्रकरणामध्ये काकाच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिला सामाजिक कार्यकर्तीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खडक पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!