पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. एका विवाहित प्रेयसीला तिच्या प्रियकराने आपल्याला सोन्याचा खजिना सापडला आहे, असे सांगून सोबत येण्याचा आग्रह केला. त्यानंतर तिला टिटवाळा येथे नेऊन तिच्यावर 35 वार करून जी क्रूरतेने हत्या केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जयराम उत्तरेश्वर चौरे त्याची विवाहित प्रेयसी हिला खजिना सापडला असल्याची बतावणी केली. त्यानंतर तिला टिटवाळा येथे घेऊन गेला आणि तिच्यावर 35 वार करून तिची क्रूरतेने हत्या केली. ही महिला पुण्यातील असून ती तिचा पती आणि तीन मुलांसोबत राहते. लग्नासाठी तिने तगादा लावला म्हणून जयराम चौरे यांनी तिची क्रूरतेने हत्या केली.
25 डिसेंबरला टिटवाळा येथे गोवेली जंगल परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिच्या आधार कार्ड द्वारे तिची माहिती शोधण्यात आली. आरोपी हा मूळ बीड जिल्ह्यातला असून पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.