धक्कादायक : बाजारपेठेत चालताना वृद्धेचा चुकून लागला धक्का ; तरुणाने केले असे काही , पाहून लोक देखील धास्तावले

651 0

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये सामान्यतः प्रचंड गर्दी असते. बाजारभागात तर चालायला देखील कठीण असते. खरंतर ही परिस्थिती मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये आहेच. पण डोंबिवलीमधील बाजारपेठेमध्ये घडलेल्या या प्रकाराने आजकालच्या तरुणाईला होतंय काय ? असाच प्रश्न पडावा असे झाले आहे.

घटना देखील अशीच आहे, बाजारपेठेमध्ये चालत असताना एका 64 वर्षीय वृद्धेचा चुकून एका 21 वर्षे तरुणाला धक्का लागला. या वृद्धीने या तरुणाची माफी देखील मागून चूक मान्य पण केली. पण या 21 वर्षे तरुणाला त्याचा संताप इतका अनावर झाला, त्याने भर बाजारपेठेमध्ये या वृद्धीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

केवळ धक्का लागला म्हणून झालेल्या या मारहाणीमध्ये ही वृद्धा जखमी झाली आहे. हातातल्या कडेने या वृद्धेला मारहाण करण्यात आली. याच्या जखमा देखील या वृद्धेला झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून रामनगर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला. या प्रकरणी सोहम सावंतयाला पोलिसांनी राहत्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!