धक्कादायक : विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराची कारला धडक; त्यानंतर कारचालकाला रस्त्यावरून नेले 1 KM फरपटत; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

1807 0

बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ज्येष्ठ व्यक्तीला दुचाकीने रस्त्यावर फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराने कारला धडक दिली. यानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला. या दरम्यान कार चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीस्वार त्याला फरफटत घेऊन गेला.

सोशल मीडियावर सध्या अंगावर शहारा आणणारा हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या घटनेत वृद्धाला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजते आहे.

Share This News
error: Content is protected !!