धक्कादायक : धुळ्यात अवघ्या 3,400 रुपयांच्या वादातून 39 वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या (VIDEO)

428 0

धुळे : धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या एका 39 वर्षीय तरुणाचा तीन अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची खळबळ जनक घटना घडली. अवघ्या 3,400 रुपयांच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलिसांनी यासीन पठाण आणि भटू चौधरी या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

एक जण फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. धुळे शहरातील कुमार नगर भागात चिनू पोपली हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्यास होता. तो रात्री घरी नसताना त्याच्या घरी आलेल्या दोन जणांनी त्याच्या पत्नीला तो कुठे आहे याबाबत विचारणा केली, मात्र त्यांनी चिनू बाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर ते दोघेही दुचाकी वरून निघून गेले, घरी आलेल्या त्या दोघांबाबत चिनू पोपली याच्या पत्नीने त्याला फोनवरून माहिती दिली.

काही वेळातच चिनू पोपली घराजवळ आल्यानंतर ते तिघेजण परत आले त्यांचा शाब्दिक वाद झाला हा वाद विकोपाला गेला त्यांनी थेट आपल्याजवळील रिव्हॉल्वर काढून चिनूवर गोळीबार केला.या घटनेनंतर जखमी अवस्थेत चिनू घरी आला त्याने आपल्या पत्नीला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली त्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Share This News
error: Content is protected !!