धक्कादायक : पालघरमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आठ जणांचा समूहिक बलात्कार; गुन्हा दाखल

459 0

पालघर : पालघरमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलीवर आठ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातपाटी पोलीस स्थानकामध्ये या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आठही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या मुलीच्या मित्रानेच तिला एका निर्जन बंगल्यावर बोलावून घेतले होते. त्यानंतर त्या बंगल्यात तिच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या नराधमाने तिला समुद्रकिनाऱ्यावर नेऊन त्याच्या आठ मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली असून या आठही आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!