Gopal Krushna Mittal

शार्क टँक फेम अनुपम मित्तल यांच्या वडिलांचे निधन

821 0

मुंबई : शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचे परीक्षक आणि प्रसिद्ध उद्योजक अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांचे वडील गोपाल कृष्ण मित्तल (Gopal Krishna Mittal ) यांचे निधन झाले आहे.

शार्क टँक इंडिया या कार्यक्रमामुळे अनुपम मित्तल यांना विशेष लोकप्रियता मिळाली. अनुपम मित्तल प्रसिद्ध उद्योजक असून ते पीपल ग्रुपचे मालक आणि Shaadi.com या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत. काही दिवसांपूर्वी अनुपम मित्तल यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे याची माहिती माहिती दिली होती.

या कार्यक्रमात अनुपम मित्तल यांच्यासोबतच ‘बोट’ कंपनीचे को सह-संस्थापक अमन गुप्ता, ‘लेंस्कार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, ‘शुगर कॉस्मेटिक्स’ कंपनीच्या सह-संस्थापक विनीता सिंह आणि ‘एमक्योर फार्मास्युटिकल्स’च्या कार्यकारी संचालक नमिता थापर हे सगळे परीक्षकाची भूमिका साकारत आहेत.

Share This News
error: Content is protected !!