लाजिरवाणी घटना : संतापाच्या भरात मामाने 2 भाच्यांना विवस्त्र करून केली मारहाण; व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा सविस्तर प्रकरण

2497 0

पुणे : पुण्यात एक अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. मामाच्या मुली बरोबर पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून भाच्याच्या दोन बहिणींना विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उरळी कांचनमध्ये घडली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भाच्याने मामाच्या मुली सोबत पळून जाऊन लग्न केले. याचा संताप मामाला अनावर झाला. त्यातूनच भाच्याच्या दोन बहिणींना मामान बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी आता लोणी काळभोर पोलिसांनी कठोर कारवाई करून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!