शाहरुख खान याच्या डिग्रीचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात…… ‘ज्याची डिग्री खरी … ‘

2508 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री मागितल्याचा कारणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने दंड ठोठावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा विषय चर्चेत असताना, शाहरुख खानची डिग्री सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्विटरवर शाहरुख खानचा एक फोटो टाकण्यात आला असून त्यात त्याच्या हातात दिल्ली युनिव्हर्सिटीची डिग्री दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या अभिनेता शाहरुख खान याचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्याच्या हातात दिल्ली युनिव्हर्सिटी ( DU) ची डिग्री दिसत आहे. डिग्री हातात असल्यामुळे किंग खान फोटोमध्ये आनंदी दिसत आहे. शाहरुख खान याचा डिग्रीसोबत फोटो व्हायरल होत असल्यामुळे अभिनेत्याची तुलना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होत आहे. सध्या सर्वत्र शाहरुख आणि त्याच्या डिग्रीची चर्चा तुफान रंगत आहे. दरम्यान,

काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. मात्र गुजरात कोर्टाने यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यांच्यावर कोर्टाने दंडात्मक कारवाई केली. त्यावर अरविंद केजरीवाल ट्विट करत म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधान किती शिकले आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार देशाला नाही का? कोर्टात त्यांनी डिग्री दाखवण्यास विरोध केला, का? त्यांची डिग्री दाखवण्याची मागणी करणाऱ्यावरच दंड लावला? असं का घडत आहे? कमी शिकलेले पंतप्रधान देशासाठी खूप धोकादायक ठरू शकतात…’ असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला.

शाहरुख खान याचा हा फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शाहरुखच्या डिग्रीच्या फोटोवर ‘ज्याची पदवी खरी आहे, तो ताठ मानेने जगतो…’ अशी कमेंट केलेली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!