शाब्बास रे पठ्ठया ! पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाड यानं ठोकले एका षटकात सात षटकार…

368 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाड या क्रिकेटपटूनं अहमदाबाद येथे झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत एकाच षटकात सात षटकार मारून विश्वविक्रम रचला. संपूर्ण देशात त्याच्या कामगिरीचा डंका वाजत असतानाच तो ज्या शहरात राहतो त्या पिंपरी-चिंचवडमध्येही जल्लोष साजरा होतोय. आपल्या मुलानं केलेल्या या विश्व विक्रमी कामगिरीवर त्याचे आई-वडीलही बेहद खूश झाल्याचं पाहायला मिळालं.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना ऋतुराज गायकवाड यानं नाबाद 220 धावा काढत एकाच षटकात सात षटकार ठोकले. या षटकात एक नोबॉलसह 43 धावा मिळाल्या. एकदिवसीय सामन्यात एकाच षटकात 7 षटकार ठोकणारा ऋतुराज गायकवाड जगातला पहिला क्रिकेटपटू ठरला. ऋतुराजनं 159 चेंडूत 10 चौकार आणि 16 षटकारांच्या साह्यानं नाबाद 220 धावांची खेळी केली. ऋतुराजनं केलेल्या विश्वविक्रमामुळं

पिंपरी-चिंचवड शहरात तसेच ऋतुराजच्या घरी उत्साहाचं वातावरण आहे. लवकरच त्याला भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळेल अशी भावना ऋतुराजच्या आई-वडलांनी व्यक्त केली.

Share This News
error: Content is protected !!