पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ३ मुलींची सुटका

811 0

पिंपरी- मुलींचे ऑनलाईन फोटो पाठवुन हॉटेल बुक करुन वेश्याव्यवसाय करणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चिंचवड येथील हॉटेल कामिनी येथे कारवाई केली. या कारवाईत तीन मुलींची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी जॅक, बबलू आणि करण ( तिघांचे पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांच्या विरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहिंसा चौक ते एसकेएफ कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल कामिनी येथे
एक व्यक्ती जॅक हे नाव वापरुन आपल्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअॅप वरुन वेगवेगळ्या मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवुन वेश्याव्यवसायाठी मुलीची निवड करण्यास सांगतो. ग्राहकाने मुलींची निवड केल्यानंतर वेगवेगळ्या हॉटेलवर ग्राहकांना बोलावुन तेथे मुलींच्या नावावर हॉटेलमध्ये रुम बुक करुन वेश्याव्यवसाय चालवतो अशी माहिती विश्वसनीय खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली

पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हॉटेल कामिनी येथे बनावट ग्राहक पाठवुन याची खात्री केली. त्यानंतर शुक्रवारी (दि. १८) संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून दिल्ली येथील दोन तर छत्तीसगड राज्यातील एका मुलीची सुटका करण्यात आली. तसेच तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एकूण ४ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त ( गुन्हे ) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्य्क पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण , सहाय्य्क पोलीस निरीक्षक डॉ . अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अमोल साडेकर, जालिंदर गारे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, अमोल शिंदे, सुमित डमाळ यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!