खळबळजनक : पुणे शहरात विक्षिप्त अघोरी कृत्य; मूलबाळ व्हावे म्हणून डोक्यावर बंदूक ठेवून खायला लावले घुबडाचे पाय आणि स्मशानभूमीतून आणलेल्या मृतांची राख

781 0

पुणे : पुण्यातून अत्यंत खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी या स्वतः बी इ कॉम्प्युटर झालेले आहेत. 2019 मध्ये त्यांचे जयेश पोकळे यांच्याशी लग्न झालं. लग्न एका फाइव स्टार हॉटेलमध्ये करून देण्यात आले. लग्नामध्ये साखरपुड्याला सासरकडच्या 45 महिलांना चांदीची जोडवी ,लग्नात तब्बल 80 तोळे सोन्याचे दागिने ,साडेपाच लाखाची सेलेरिओ कार आणि लग्नानंतर पुन्हा सण वाराला सोन्याच्या चेन, ब्रेसलेट ,अंगठ्या पुन्हा 2020 मध्ये चार चाकी गाडी घेण्यासाठी दहा लाख रुपये अशी सातत्याने पैशांची मागणी होतच होती. पण हा प्रकार हुंड्याचा नाहीये. हा प्रकार आहे मूल होत नाही म्हणून केलेल्या अघोरी कृत्याचा…

लग्न झाल्यापासून फिर्यादी यांना त्यांच्या घरातील तळघरांमध्ये सासर कडचे लोक हे काहीतरी काळी जादू प्रकार करत असल्याचं माहीत होतं. दर अमावस्येला आघोरी पूजा मांडली जायची लिंबू, काळ्या बाहुल्या, टाचण्या, मिरची, हळदीकुंकू, बुक्का असे या पूजेमध्ये सामान आणलं जायचं. हा प्रकार लग्न झाल्यापासून सुरूच होता.

दरम्यान 11 फेब्रुवारी 2021 रोजी फिर्यादी यांच्या निगडीतील घरी पूजा मांडण्यात आली होती. या पूजेमध्ये मृत माणसाचे केस, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके हे सर्व काही जावेच्या वडिलांनी आणून ठेवले होते. मांत्रिक महिलेने आघोरी पूजा झाल्यानंतर या हाडाची पावडर करून ती फिर्यादी यांना खाण्यास सांगितली. यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. त्यानंतर जावेचे वडील दीपक जाधव यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वर फिर्यादी यांच्या डोक्याला लावले आणि ही पावडर जबरदस्तीने खाण्यास भाग पाडले. त्याचबरोबर फिर्यादी यांना लाथा बुक यांनी मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार बऱ्याच वेळा घडला. यात फिर्यादी यांची तब्येत देखील बिघडली. एवढे होऊनही सासरकडच्या लोकांनी आठ लाख रुपयांची मागणी केली.

सातत्याने हा प्रकार घडत असताना फिर्यादीच्या माहेरकडच्या लोकांनी देखील पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादीला सातत्याने वांझोटी म्हणून अपशब्द वापरण्यात येत होते. तसेच अधिक त्रास वाढल्यानंतर फिर्यादी यांनी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक वेळा प्रयत्न करूनही फिर्यादी यांना सासरी नांदून घेतले गेले नाही , म्हणून अखेर फिर्यादी यांनी सिंहगड रोड पोलीस स्थानकात क्रिया दाखल केली. त्यानंतर हा विक्षिप्त प्रकार उघडकिस आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांचे पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ इशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, त्यासह जावेचे आई-वडील दीपक जाधव आणि बबीता जाधव यांच्याविरुद्ध विवाहितेचा छळ तसेच महानरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य म्हणजे एका अत्यंत सुशिक्षित आणि धनदांडग्या घरातील मुली बाबत हा प्रकार उघडकीस येण्यासाठी एवढा वेळ लागला आहे. त्यात पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या शहरामध्ये असे आघोरी कृत्य घडावे हे नवल आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!