संजय राऊतांचे खळबळजनक पत्रं ! “ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आली आहे…” संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र, वाचा काय आहे प्रकरण….

619 0

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी नुकतेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी एक मोठा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केला आहे. ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आली असल्याचं या पत्रामध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रिय देवेंद्रजी

जय महाराष्ट्र,

“गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे. आणि गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात. तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो, ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.” असं संजय राऊत यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!