crime

खळबळजनक : आयटी अभियंत्याने ८ वर्षाच्या मुलाला संपवले; त्यानंतर पत्नीला दिला असा भयानक अंत, आणि मग स्वतः…

1005 0

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात औंधमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील तिघांचेही मृतदेह राहत्या घरात आढळून आले आहेत. टीसीएस सारख्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या आयटी अभियंताने आपल्या आठ वर्षाच्या मुलाला आणि पत्नीला संपवून त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या घटनेमध्ये 44 वर्षीय सुदिप्तो गांगुली ,पत्नी प्रियंका गांगुली वय वर्ष ४० आणि मुलगा तनिष्क गांगुली वय वर्ष ८ यांचा मृत्यू झाला आहे. दोघेजण फोन उचलत नसल्याकारणाने सुदिप्तो गांगुली यांच्या भावाने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बुधवारी सकाळी येथील त्यांच्या राहता घरी तपासणी केली असता या तिघांचंही मृतदेह आढळून आले आहेत.

पत्नी प्रियंका गांगुली आणि मुलगा तनिष्क गांगुली यांच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी लावलेली होती. तर सुदिप्तो गांगुली यांनी प्रथम या दोघांना संपवून त्यानंतर आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चतुशृंगी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जर ही आत्महत्या असेल तर सुदिप्तो गांगुली यांनी असे मोठे पाऊल का उचलले ? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!