मुंबई : ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केलं आहे. ज्येष्ठ माध्यमकर्मी अशी ओळख असणारे विश्वास मेहेंदळे यांनी सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती.
विश्वास मेहंदळे वृत्तनिवेदक, लेखक तसेच अभिनेता म्हणून देखील त्यांनी काम केले होते. अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनासोबतच 18 हून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. याव्यतिरिक्त मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जायचे. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही होते. तसेच, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ‘सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस्थापक होते.