खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ‘ऐश्वर्य कट्ट्याचा’पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

322 0

पुणे : प्रत्येक वेळी मान्यवरांच्या उपस्थितीने रंगणाऱ्या ऐश्वर्या कट्ट्यावर आज एक वेगळीच रौनक आलेली होती. उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. निमित्तही अर्थात तसेच होते. वर्षभर सातत्याने चालवण्यात येणाऱ्या ऐश्वर्य कट्ट्याचा आज पहिला वर्धापन दिन होता. आणि आज प्रमुख पाहुणे म्हणून कट्ट्याच्या मानकरी होत्या सुप्रियाताई सुळे!

सुप्रियाताईंच्या उपस्थितीने आजचा आनंद द्विगुणित झाला होता. पारंपारिक पण शाही पद्धतीने सुप्रिया ताईंचे ऐश्वर्या रेणुसे सोनाली सोळंकी व पूजा रेणुसे यांनी स्वागत केले. मार्गदशक अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, डॉ. सतीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

ऐश्वर्य कट्ट्याची संकल्पना, वर्षभरात इथे येऊन गेलेले मान्यवर हे सारे जाणून घेत सुप्रियाताई ऐश्वर्य कट्ट्याच्या संकल्पनेला मनापासून दाद दिली. कट्ट्याच्या दिलखुलास वातावरणात त्यादेखील मनसोक्त रमल्या. सुप्रियाताई यांच्या हस्ते केक कापून प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

“ऐश्वर्य कट्ट्याच्या रूपाने सामाजिक सलोखा जपण्याचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. राजकारणाच्या पलीकडे लोक या निमित्ताने एकत्र येथील आणि सामाजिक संवाद वाढत जाईल असे मत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज व्यक्त केले.


राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विविध घडामोडींविषयी त्यांनी यानिमित्ताने मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे राज्याच्या विकासासंदर्भातील त्यांचे व्हिजनदेखील स्पष्ट केले. संसदीय कार्यपद्धतीची आणि तेथील प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली.


याप्रसंगी माझ्यासह नगरसेवक दत्ता धनकवडे, विशाल तांबे, काका चव्हाण, युवराज बेलदरे, अश्विनी भागवत, संतोष फरांदे, सुधीर कोंढरे, चंद्रकांत कुंजीर अजय कांबळे व अप्पा रेणुसे मित्र परिवारातील सर्वजण आवर्जून उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!